'कोरोना मुळे वाचले कमलनाथ

Foto
कोरोना विषाणूने जगभर मृत्यूचे थैमान घातले असले तरी मध्य प्रदेश सरकारसाठी  कोरोना व्हायरसने कमलनाथ सरकारला मात्र दिलासा दिला आहे. करोनामुळे मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी विधानसभा २६ मार्चपर्यंत स्थगित केली आहे. त्यामुळे आज विश्वासदर्शक ठरावच होऊ शकला नाही. यामुळे कमलनाथ सरकारवर ओढावलेले संकट काही काळासाठी टळले आहे

विधानसभा सुरु झाल्यानंतर राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषण गोंधळातच सुरु केले. साकार अल्पमतात असतानाही राज्यपाल त्यांचे कौतूक करण्यासाठी आले आहेत का? असा प्रश्न भाजपचे नेते नरोत्तम मिश्रा यांनी विचारला. मात्र, राज्यपालांनी आपले भाषण सुरूच ठेवले. आमदारांनी संविधानाच्या नियमांचे पालन करावे,या से आवाहन करत लालजी टंडन यांनी एका मिनिटांत भाषण संपविले.
दरम्यान, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. यासोबत २२ आमदारांनीही काँग्रेसची साथ सोडली होती. यामुळे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker